अमोल ढोरसिंगे यांचा लोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

अमोल ढोरसिंगे यांचा लोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील रहिवासी व दैनिक सामना या वर्तमानपत्राचे वार्ताहार तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा लातूर चे निलंगा तालुकाअध्यक्ष म्हणुन गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कर्तव्याचा सन्मान म्हणुन त्यांना लोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पत्रकारांचे मराठवाडास्तरीय विभागीय अधिवेशन नोहेंबर महिन्यात घेण्यात आले होते तेव्हा अपुऱ्या वेळेअभावी कांही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार व उत्कृष्ट तालुका अध्यक्ष हे पुरस्कार देण्याचे राहुन गेले होते त्यामुळे आज पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक देडे यांनी निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार बैठक घेऊन तेथे निलंगा तालुका अध्यक्ष म्हणुन व एक पत्रकार म्हणुन अनेक समाजसेवेची कार्य केलेली असल्याचे बोलुन दाखवत त्यांचे लोकनेते विलासराव देशमुख लातूर भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आणी येत्या १८ डिसेंबर रोजी ठाणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व पत्रकारांनी अवर्जुन सहभागी व्हावे असे अवाहन करुन लातुर येथील अधिवेशनात सहभागी पत्रकार यांनाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अशोक देडे, निलंगा तालुका अध्यक्ष अमोल ढोरसिंगे, जेष्ठ पत्रकार शाम मुळजकर, राजाभाऊ सोनी, विद्यासागर पाटील, बालाजी कांबळे, भगवान जाधव व इतर पत्रकार उपस्थित होते.

About The Author