उपप्राचार्य बालाजी गोडभरले यांना राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार प्रदान

उपप्राचार्य बालाजी गोडभरले यांना राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार प्रदान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत क. महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक तथा उपप्राचार्य बालाजी गोडभरले यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने प्रोटानच्या तिसऱ्या विभागीय राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान या शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे तिसरे महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात संपन्न झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष तथा बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे होते तर उद्घाटक म्हणून औरंगाबाद येथील उत्तमराव सोनकांबळे, जि.प. सोलापुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रोटान चे राज्य अध्यक्ष डॉ. दाभर्डे महासचिव गोरखनाथ वेताळ राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र राजदीप, राष्ट्रीय महासचिव कुरणे, सोलापूर जिल्हा प्रोटान चे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, महासचिव राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष बशीर तांबोळी, अकबर नदाफ, कार्याध्यक्ष सतीश कांबळे ,कोषाध्यक्ष संतोष कांबळे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. मोरे अनिल, जिल्हाध्यक्ष प्रा. ननीर सतिश, लसाकम तालुकाध्यक्ष गंगाधर साखरे, डॉ. बालाजी कारामुंगीकर यांच्या उपस्थितीत उपप्राचार्य बालाजी गोडभरले यांना राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उपप्राचार्य बालाजी गोडभरले यांनी शैक्षणिक, सामाजिक, प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. तसेच ते स्वत: व्यसन मुक्त असुन व्यसन मुक्तीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करीत असतात. कॉलेजसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी सदैव वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम ते कॉलेजमध्ये राबवित असतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2021 चा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरिल पुरस्कार प्राप्त झाल्याबद़दल उपप्राचार्य गोडभरले यांचे संस्था सचिव, दलित मित्र, शिक्षण महर्षि डी. बी. लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही.व्ही. गंपले यासह सर्व प्राध्यापक, शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंत क. महाविद्यालयाध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. घोरबांड गिरीधर, प्रा. सय्यद एम. यू., प्रा. अंगद बोबडे, प्रा. तोंडारे दिनेश, प्रा. विश्वांभर स्वामी, प्रा. अनमोल पटवारी, प्रा. पुणे रविकुमार, प्रा. सतिष ननीर, प्रा. शिवशंकर चिद्रे, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. क्षिरसागर नंदकुमार, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. इरफळे रवि, प्रा. मलशेट्टे श्रीशैल्य, डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्रा. घटकार एस.टी., प्रा. राहुल देशमुख, प्रा. चिवडे निळकंठ, युवराज पाटील, शरद क्षिरसागर मोहन कांबळे यासह सर्व स्तरातील मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

About The Author