मुंडे साहेबाचा संघर्ष आपल्या मुलांना समजावून सांगा – शिवश्री डॉ. अशोक बांगर
अहमदपूर (गोविंद काळे) : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान रुद्धा ता अहमदपूर यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे याची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवश्री डॉ अशोकजी बांगर याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ बांगर यांनी अठरापगड जातील आपला वाटणारा एकमेव लोकनेता स्व मुंडे हेच आहेत. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला आपलेसे करून घेण्याचे काम ज्या माणसांनी केलं. ऊसतोड मजुरांचा मुलगा ते केंद्रीय मंत्री असा त्याचा प्रवास आपल्या मुलांना प्रेरणा देणारे आहे. मुंडे साहेबाची चरित्र आपल्या मुलांना समजावून सांगा त्यांच्या संघर्षाची कहाणी मुलांना समजावून सांगा अशा शब्दांमध्ये आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, मा.आ. बब्रुवान खंदाळे, जि.प सदस्य अशोक काका केंद्रे यांनी साहेबांसोबत असतानाच्या आठवणीला उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच नाथराव केंद्रे यांनी मांडले यावेळी मुंडे साहेबांच्या जाण्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु त्यांचे विचार आपल्या सोबत घेऊन चालायला शिका असे मत मांडले.
यावेळी सूत्रसंचालन शिवा कराड तर आभार सतीश केंद्रे यांनी मांडली.
यावेळी गावातील नागरिक, महिला व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुल अभिवादन केले.