अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्तच्या जयघोषात औराद (शहा) येथे श्री गुरूचरिञ पारायण व श्री दत्त जन्मोत्सव संपन्न
औराद शहा (भगवान जाधव) : श्री दत्तमंदिर सेवा प्रतिष्ठान , दत्त जयंती उत्सव समिती, औराद (शहा) यांच्या सौजन्याने श्री गुरूचरिञ पारायण व दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हे जन्मोत्सव साजरा करण्याचे 40 वे वर्ष होते.
दिनांक 14-12-21 ते 18-12-21 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी चार दिवसाचे गुरूचरिञ पारायण पठन करण्यात आले. यात 11 जोडप्या सह एकूण 51 वाचकांनी वाचन केले. व्यासपिठाधिकारी म्हणून ह.भ.प. दयानंद महाराज कोळी यांनी काम पाहिले. दररोज हरिपाठ व विविध महाराजांचे किर्तन झाले. पुज्यश्री ह.भ.प. काकासाहेब महाराज एकंबीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व श्री दत्त जन्माचा पाळना गाऊन दत्त जन्मोत्सव संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रख्यात पखवाज वादक ह.भ.प. दत्तप्रसाद तापडिया, आळंदीकर यांची साथ मिळाली. कार्यक्रमासाठी श्री दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री. मच्छिंद्र कोळी कोषाध्यक्ष श्री. दत्ताञय कोळी यांनी पुढाकार घेतला.
श्री. दत्त जन्मोत्सवानंतर ग्रामीण रूग्णालय, औराद (शहा) च्या समोरील दक्षिणमुखी बाल हनुमान मंदिर जिर्णोद्धारासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी दत्त जयंती उत्सव व दक्षिणमुखी बाल हनुमान मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष पांडूरंग भंडारे, उपाध्यक्ष मोहनराव भंडारे, सचिव लक्ष्मण बोंडगे, प्रेमचंद बियाणी, डॉ. डी. एस. कदम, डॉ. मल्लीकार्जुन शंकद, गणपतराव गणापूरे, ॲड. संतोष गस्तगार,अशोकराव बोडे, राजू झंवर, गणपतराव सुतार, अनुराग लड्डा,रामगिर गिरी.गोविंदराव मरगणे इत्यादी सदस्या सह गावातील नागरीक उपस्थित होते.