संत गाडगे बाबा म्हणजे चालती बोलती पाठशाळा- गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवणुक गाडगेबाबा देत असतात म्हणूनच गाडगेबाबा म्हणजे चालती बोलती पाठशाळा होती अशा शब्दात संस्था अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा ता अहमदपूर च्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत गाडगे महाराज स्मृतिदिनी अभिवादन केले.
यावेळी बोलताना श्री हाके म्हणाले अंगावर फाटके-तुटके कपडे, डोक्यावर झिंज्या, खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, दुसऱ्या कानाला फुटक्या बांगडीची काच, एका हातात खराटा, दुसऱ्या हातात मडके असा गाडगेबाबांचा वेश असे म्हणून लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ असे म्हणत असत असे मत गणेश हाके यांनी मांडले.
यावेळी दै. लोकमत या वृत्तपत्राने कर्तृत्ववान महिला म्हणून संस्था सचिव तथा जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा प्राचार्य रेखाताई तरडे यांच्या निवडीबद्दल शाळेच्या वतीने प्राचार्य रुत चक्रनारायण यांनी रेखाताईचा सत्कार केला.
यावेळी बोलताना असे कार्यक्रम वारंवार शाळेमध्ये व्हावेत अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टेज करेज मिळते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत संस्था सचिव रेखाताई तरडे यांनी व्यक्त केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या वेश-भूषेत येऊन परिसर स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली होती सर्व लहान बालकांचे संस्था अध्यक्ष गणेश हाके व संस्था सचिव रेखाताई तरडे यांनी तोंडभरून कौतुक केले.
तसेच संस्थेतील स्वच्छता कर्मचारी केशव तोंडारे यांचा गौरव गाडगेबाबा स्मृतिदिनी संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक कुलदीप हाके संचालिका शिवलिका हाके, प्राचार्य रूत चक्रनारायण, शुभांगी सूर्यवंशी, भरत कानवडे, सय्यद नवाल, मलकानी निजमुद्दिन, केशव तोंडारे, अनंत उदगिरे, रवी नरवटे आदींनी परिश्रम घेतले.