यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍पाचे लोकार्पण

यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍पाचे लोकार्पण

लातूर (प्रतिनिधी) : एमआयटीच्‍या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात उभारण्‍यात आलेल्‍या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍पाचे लोकार्पण जगविख्‍यात शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास यांच्‍या शुभहस्‍ते आणि एमआयटीचे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. विश्‍वनाथजी कराड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दि. २३ डिसेंबर रोजी करण्‍यात आला.

एमआयटी आर्ट डिझाईन टेक्‍नोलॉजी विद्यापीठ पुणे येथील शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांच्‍या वतीने सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून येणा-या काळात कोरोना व तत्‍सम रोगावर मात करता यावी यासाठी लातूर येथील यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालय ऑक्‍सीजन निर्मितीत स्‍वंयपूर्ण व्‍हावे व गरजू रूग्‍णांना ऑक्‍सीजनची कमतरता भासू नये यासाठी प्रतिदिन ५ लाख ६१ हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्‍प भेट देण्‍यात आला असून सदर प्रकल्‍पातून ऑक्सिजन निर्मिती कार्यान्‍वीत झालेली आहे.

गरजू रूग्‍णांच्‍या सेवेत दाखल झालेल्‍या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयातील ऑक्सिजन प्रकल्‍पाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी सायंकाळी देशाचे माजी राष्‍ट्रपती तथा शास्‍त्रज्ञ भारतरत्‍न स्‍व. अब्‍दुल कलाम, शास्‍त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्‍यासह इतर अनेक भारतीय शास्‍त्रज्ञासोबत काम करणारे अमेरीका स्थित जगविख्‍यात शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास यांच्‍या शुभ हस्‍ते व एमआयटी शिक्षण संस्‍था समुहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. विश्‍वनाथजी कराड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत करण्‍यात आले.

गेल्‍या दोन वर्षात कोरोना या महाभयंकर आजारामुळे अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले. दरम्‍यान यशवंतराव चव्‍हाण रूग्‍णालयाने कोरोनाच्‍या कार्यकाळात प्राप्‍त परिस्थितीनुसार मिळालेल्‍या साधन सामुग्रीतून रूग्‍णांना सेवा देण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतू अजूनही शंभर टक्‍के कोरोना आजारापासून देश मुक्‍त झालेला नाही. भविष्‍यातही असे संकट पुन्‍हा निर्माण होवू नये व त्‍या परिस्थितीत रूग्‍णांना ऑक्सिजन अभावी आपला प्राण गमवण्‍याची वेळ येवू नये यासाठी एमआयटी आर्ट डिझाईन टेक्‍नोलॉजी विद्यापीठ पुणे येथील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांच्‍या वतीने ट्रायडंन्‍ट कंपनीचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प लातूर येथील यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयास भेट देण्‍यात आलेला आहे.

याप्रसंगी संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त प्रा. राहूल कराड, एमआयटी आर्ट डिझाईन टेक्‍नोलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्‍यक्ष तथा कलगुरू डॉ. मंगेश कराड, संस्‍थेच्‍या सहव्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त डॉ. सुचित्रा नागरे, विश्‍वस्‍त तुळशीराम कराड, काशीराम कराड, डॉ. सुनिल कराड, एमआयटी आर्ट डिझाईन टेक्‍नोलॉजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, अधिष्‍ठाता डॉ. रामचंद्र पुजारी, लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्‍पा कराड, डॉ. हनुमंत कराड, लातूर मेडीकल कॉलेजचे अधिष्‍ठाता डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्‍ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक सं‍चालिका डॉ. सरिता मंत्री, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे तसेच लातूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांची उपस्थिती होती.

About The Author