लातूर तालुक्यातील रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजुर

लातूर तालुक्यातील रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजुर

आमदार धीरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश राज्यशासनाकडून भरीव निधी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीणचे आ.धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील लातूर तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांच्या व पुलाच्या बांधकामासाठी २८ कोटी 80 लाख रुपये इतका भरघोस निधी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला आहे. यापैकी लातूर तालुक्यातील 14, 16, 17 या प्रमुख जिल्हा मार्गासह इतर रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 28 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे लातूर तालुक्यांतील बोकनगाव, बिंदगीहाल, बोरी, भातांगली, धनेगाव, ममदापूर, उमरगा ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ बोकनगाव यांनी दिली आहे.

लातूर तालुक्यातील अनेक दिवसापासून रस्त्याची, पुलाचे बांधकाम यासाठी निधीची मागणी केली होती त्यानुसार लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर आज निधी मंजूर करण्यात आला असून तालुक्यांतील खालील गावांना निधी मंजूर झालेली कामे याप्रमाणे आहेत

  • प्रजिमा 4 सांगवी रामा 236 ते काडगाव- मांजरी- सामनगाव- चिकुर्डा- प्रजिमा 9 (प्रजिमा 14) 0/00 ते 1/00 (टाकळी गाव) रस्त्याची पुनर्बांधणी करणे. प्रजिमा 4 सांगवी रामा 236 ते काडगाव- मांजरी- सामनगाव- चिकुर्डा- प्रजिमा 9 (प्रजिमा 14) 9/100 ते 12/400 (मांजरी ते चिकुर्डा) रस्त्याची सुधारणा करणे. भाडगाव- उमरगा- शिवणी खु.- रामा 236 ते प्रजिमा 17 रस्ता (प्रजिमा 16) 0/00 ते 2/00 आणि 6/00 ते 8/00 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे. -भडी (34/500) ते बिंदगीहाळ (52/400) रस्त्याची सुधारणा करणे, मुरुड वळण रस्त्याची (रा. मा. 145) सुधारणा करणे या कामांना मंजुरी मिळाल्याने लातूर तालुक्यातील विविध रस्ते पुलाच्या कार्याला मोठी चालना मिळणार आहे.

या विकासकामाला निधी दिल्याबद्दल राज्यातील आघाडी सरकारचे मांजरा साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ, शंकरराव बोलंगे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सरपंच दयानंद स्वामी, उपसरपंच किशोर दाताळ, सतिश पाटील, सचिन दाताळ, दगडु पडीले, जितेंद्र स्वामी, अँड श्रीरंग दा ताळ, राजेसाहेब पाटील,संभाजी रेड्डी, प्रताप पडीले, ज्ञानोबा शेंडगे, बोकनगाव, बोरी, उमरगा, बिं दगीहाल, धनेगाव ममदापूर येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.

About The Author