दयानंद कला महाविद्यालयात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

दयानंद कला महाविद्यालयात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलीत दयानंद कला महाविद्यालयात फॅशन ड्रेस डिझाईन हा अभ्यासक्रमास चालवला जातो यामध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या कलागुणाना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणजेच या विभागाद्वारे दि.२२, व २३ डिसेंबर रोजी दोन दिवसीय ड्रेपिंग अँड स्टिचिंग ऑफ नऊवारी साडी (रेडी टू वेअर) वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. नांदेड येथील प्रसिद्ध नऊवारी स्टिचिंग डिझायनर सौ .रूपाली वट्टमवार यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना पेशवाई व मस्तानी या दोन प्रकारच्या साड्यांचे स्टिचिंग दाखविण्यात आले. या वर्कशॉप चा उद्देश प्रामुख्याने विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करता येईल व फॅशन सोबत परंपरा याची जपणूक करून ग्राहकांना नऊवारी साडी रेडी टू वेअर मध्ये उपलब्ध होईल.

दयानंद शिक्षण संस्थेमार्फत दयानंद आर्ट गॅलरीमध्ये या नऊवारी साड्याचे दि. 25 डिसेंबर 2021 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमाचे कौतुक दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष आरविंदजी सोनवणे, ललीतभाई शहा, रमेशकुमारजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त् सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे सरांनी विभागास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वर्कशॉप साठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी होता.

About The Author