सर्व रोगनिदान व उपचार शिबीर
उदगीर (प्रतिनिधी) : कालवंदे समाज मंदिर उदगीर येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर परिषद यांच्या अंतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी सेंटर, उदगीर यांच्या अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुशिलाबाई चव्हाण, रुपेंद्र चव्हाण उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. स्वाती सोनवणे मॅडम, डॉ. इरशाद शेख व डॉ. प्रशांत नवटके होते. या वेळी 102 जनांची मधुमेह यांची व रक्तदाब यांची तपासणी करण्यात आली,त्यात 22 मधुमेह तर 26 जण रक्तदाबाची रुग्ण आढळून आले. या कार्यक्रमांमध्ये ANM चे पाटील एस आर, केंद्र पी. बी., खडके, कापडे,फिंरगे सिस्टर उपस्थित होते, तर अशा वर्कर छाया सोनकांबळे, निकिता कांबळे, ज्योती सुतार, उषा आमले उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये भारती डी. बी., फुटेवर तुकाराम यांनी औषधे वाटप केले तर मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी केशव बिरादार, अफताब शेख यांनी केली.
