उदगीर (एल पी उगीले)
उदगीर सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ आणि वर्ग-२ सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कित्येक अधिकारी मुख्यालयीन न राहता घर भाडे आणि एनपीए अनधिकृत उचलून शासनाची फसवणूक करत असल्याचाही तक्रारी होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीने शासनाकडे चौकशीची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून चौकशी सुरू झाली आहे. अधिकारी आणि जबाबदारीचे डॉक्टर, तज्ञ हे मुख्यालय राहत नसल्यामुळे
उदगीर येथील पेशंट लातूर किंवा उदगीर येथील खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रेफर करावे लागत आहेत.
उदगीर येथील रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून देखील या ठिकाणच्या आयसीयू ची सेवा बंद राहणे,कसलीच सुविधा न मिळणे,रोज स्वच्छता न होणे,रुग्णांना जेवणाचा दर्जाची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक शिवाय पगारी काढणे,ट्रामा केयर न चालू करणे अशा तक्रारींची दखल घेऊन माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी लेखी निवेदन देऊन गेल्या २ वर्षांपासूनची चौकशी व कार्यवाही ची मागणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण कॅबिनेट मंत्री ना. प्रकाशजी अबीटकर यांना दिली, त्यावर आरोग्य मंत्री महोदयांनी जागेवरच तात्काळ चौकशी समिती नेमणूक करून पुढील कार्यवाहीची आदेश दिले आहेत.
त्यानुसार उपसंचालक डॉ. सतीश सोळंखे दि.१८/१०/२६ रोजी उदगीर येथील रुग्णालयाला अचानक भेट देऊन सर्व चौकशी केली. त्यावेळी पण जवाबदार अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.
त्यानंतर लातूर सिव्हिल सर्जन यांची टीम येऊन चौकशी करून सत्य जाणून घेतले. चौकशी समितीने सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून सर्व अहवाल जमा करून घेतला आहे.
वर्ग-१ मध्ये १२ वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यापैकी ७ ते ८ जण सतत गैरहजर राहतात, आणि मुख्यालयात वास्तव्यास नसतात.
वर्ग - २ मध्ये ४२ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यापैकी जवळपास १५ जण गैरहजर व मुख्यालयात नसतात. सर्वजण अनधिकृत घर भाडे आणि एनपीए खोटी प्रतिज्ञा पत्र देऊन शासनाकडून पैसे घेत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा घोटाळा वैद्यकीय अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर लवकरच कार्यवाही होऊन,उदगीर सामान्य रुग्णालय पूर्ण सुधारणा झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी यांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.














Responses (0 )