दुष्ट प्रवृत्तीचा नाश भक्ती शक्तीने होतो – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

दुष्ट प्रवृत्तीचा नाश भक्ती शक्तीने होतो - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

वडवळ (गोविंद काळे) ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावर दुष्ट प्रवृत्ती बळावते त्यावेळी तिचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वर मानवाच्या रूपात येऊन दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण करतो प्रत्यक्ष परमेश्वर प्रत्येक मानवाच्या रूपातच आहे असे विचार प्रख्यात निवेदक व्याख्याते प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. वाघोली ता.चाकूर येथे आई तुळजाभवानी माता मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने किर्तन उत्सवातील प्रवचन सोहळ्यात प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता सांगताना हे अर्जुना तू प्रत्यक्ष माझाच अंश आहेस करता करविता मीच आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावर अन्याय अत्याचार वाढेल त्यावेळी दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि मानवाचा उद्धार करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागला येथील दुष्ट प्रवृत्ती आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी अनेक वेळा माता पार्वतीला वेगवेगळ्या देवीच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट व्हावे लागले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने स्वबळावर रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि पाच पातशाहांना परताऊन लावले असे शिवरायांनी धर्माचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन केले असेही प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथम राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन झाली.या कार्यास उदघाटक म्हणून व्यंकटराव सोनवणे होते. प्रतिमेचे पुजन उषाताई केंद्रे यांच्या हास्ते सपन्न झाले.या वेळी व्यासपिटावर उपस्थित मुख्याध्यापक अप्पाराव केंद्रे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी केंद्रे, उपसरपंच नंदुलाल सोनवणे,भागवत सोनवणे होते अदिची उपस्थिती होते.

About The Author