कोतवाड वाईन शॉप बंद करण्यासाठी आमरण उपोषण
अहमदपुर (गोविंद काळे) : राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक लातुर व जिल्हाधिकारी यांना वेळोवळी निवेदनाद्वारे पुरावे सह माहिती देऊन ही जागा मालकांच्या परवानगी शिवाय बेकायदेशीररित्या राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांच्या कॄपा आशिर्वादाने चालु असलेले कोतवाड वाईन शाँप बंद करा म्हणुन कित्येक वेळी निवेदन देऊन ही यावर हे न्याय मिळण्यासाठी दि. २४/११/२०२१, रोजी निवेदन दिले यावर २९/११/२०२१ रोजीचे निवेदन दिले, दि. १७/०२/२०२२, दि. ०२/०३/२०२२ रोजी व दि.१०/०३/२०२२ अश्या प्रकारे अनेक महिने होऊन गेली, उपोषणात येऊन खोटी आशवासने देऊन मनमानी करणारे,या बेशिस्त व बेजवाबदार अधिकारी यांच्या मुळे पुन्हा एकदा अमरण उषोषण करण्याची वेळ लक्ष्मण अलगुले यांच्या वर आली, सर्वसामान्याला कधी न्याय भेटणार आणि या अधिकारी यांची चौकशी होऊन यांचे निलंबन कधी होणार असे लक्ष्मण अलगुले यांचे म्हणणे आहे, हुकुमशाही पध्दतीने चेरी मेरी घेऊन जर अन्याय होत असेल तर लोकशाहीवर गद्दा नाही का संविधानात या मुठभर मातभर अधिकारियांनाच मनमानीचा अधिकार दिला आहे का असा प्रश्न या उपोषण करते लक्ष्मण अलगुले यांनी माडला आहे. दि.२८/०३/२०२२ रोजी उपविभागिय कार्यालय समोर पुन्हा एकदा आपल्या न्याय हक्कासाठी व अधिकारयांच्या मनमानी भ्रष्ट कारभाराला वाचा फोडण्यासाठी उपोषण करणार आहे, म्हणुन सांगितले आहे, आणखिन किती उपोषणणे आंदोलने, आत्मदहन करावे लागणार हे प्रश्न चिन्ह दिसत आहेत. प्रशाशन या गंभीर प्रश्नाची दखल घेणार का, न्याय हक्कासाठी या उपोषण करत्याला आणखिन किती संघर्ष करावा लागणार आहे. याला प्रशाशन कधी न्याय देणार.
