राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या चार तलवारबाजीपटूंची चमकदार कामगिरी
अहमदपूर (गोविंद काळे) : 26 ते 28 मार्च 2022 रोजी छत्तीसगड राज्यातील रायपुर येथे पार पडलेल्या 23 व्या सब ज्युनियर तलवारबाजी स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील खेळाडू साईप्रसाद जंगवाड, जान्हवी जाधव, वैभवी माने,साक्षी गोरगीळे या चार खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती .त्यामध्ये साईप्रसाद जंगवाड याने वैयक्तिक इपी प्रकारात कास्य पदक ,तसेच सांघिक इपी प्रकारामध्ये सुद्धा कास्य पदकाची कमाई केली आहे. त्याने वैयक्तिक प्रकारांमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील खेळाडूला 15 -8 ने पराभूत करून टॉप 8 मध्ये आपले स्थान निर्माण केले .सेमी फायनल मॅच मध्ये जम्मू कश्मीरच्याच खेळाडूला15- 9 ने पराभूत करून कांस्य पदक प्राप्त केले आणि देशात तिसरे स्थान मिळवले . तसेच सांघिक सामन्यांमध्ये सुद्धा छत्तीसगड या संघाला 15 – 6 उत्तराखंड संघाला 15-7 नेपराभूत करून कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्याच प्रमाणे जान्हवी जाधव हिने सुद्धा इपी वैयक्तीक या खेळ प्रकारांमध्ये तेलंगणा राज्यातील खेळाडूला 15 – 9 ने ,तसेच हरियाणा राज्यातील खेळाडूला 15 – 13 ने पराभूत केले. हरियाणा राज्यातील भिंगारा शर्मा हिला सुद्धा 15 – 9 ने हारवून भारतात तिसरे स्थान पटकावले . तसेच सांघिक खेळामध्ये सुद्धा दिल्ली या संघाला 15 – 2 ने, चंदिगड या संघाला 15 – 4 ने पराभूत केले आणि अंतिम सामन्यांमध्ये तामिळनाडू या राज्याला 15 – 12 ने हरवून रौप्य पदकाची कमाई केली . तसेच लातूर जिल्ह्यातील दुसरी खेळाडू वैभवी माने हिने सुद्धा इपी या सांघीक प्रकारात चंदीगड, दिल्ली, तामिळनाडू, या संघाला पराभूत करून रौप्य पदकाची कमाई केली . वैयक्तिक प्रकारांमध्ये सुद्धा पंजाब राज्यातील अर्पणा हिला 15 – 7 ने पराभूत केले आणि देशात 6 वी रँक पटकावली. तर सेबर या प्रकारात नवख्या आसलेल्या साक्षी गोरगीळेने ही चमकदार कामगीरी करत उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळवला. अशाप्रकारे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत एकूण 5 पदकांची कमई करुन देशात आपले, आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उंचावले आहे. त्यांना मोसीन शेख,आकाश बनसोडे, बबलू पठाण, रोहित गलाले, आदित्य ससाने यांनी मार्गदर्शन केले. विजय खेळाडूंचे अभिनंदन लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. अभिजित मोरे सर ,सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले सर लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सर्व सदस्य काझी वजीरोद्दिन,वैभव कज्जेवाड, तसेच यशवंत विद्यालयाचे मु.अ.गंपले सर,अहिल्याबाई होळकर विद्यालयचे मु.अ. प्रशांत माने सर, किलबिल नॅशनल स्कूल चे संचालक ज्ञानोबा भोसले सर, कृष्णा शिंदे,जयदीप नागरगोजे आदींनी अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.