एक महिन्याच्या आत कबालनामे वितरीत करा अन्यथा तीव्र अंदोलनाचा ईशारा..!

एक महिन्याच्या आत कबालनामे वितरीत करा अन्यथा तीव्र अंदोलनाचा ईशारा..!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील स.नं. 4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम करून कबालनामे वाटपाची प्रक्रिया जाणीवपूर्वक अतिशय संथ गतीने चालू असून जिल्हाधिकारी महोदयांनी यात लक्ष घालून पात्र अतिक्रमण धारकांकडून शासकीय मूल्यांकन तातडीने भरून घेवून एक महिन्याच्या आत कबालनामे वितरीत करावे अन्यथा प्रभागातील नागरीकांना सोबत घेवून रास्तारोको/जेलभरो/शहरबंद/धरणे निदर्शने अंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे दिला आहे.

नूकतेच लातूर येथे मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर शहरातील स.नं.4 या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानूकूल करण्यास “शासकीय जमीन नियमानूकूल करणाऱ्यां समिती” यांनी मान्यता प्रदान करण्यात आली आहे, त्यानूसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांनी तहसिलदार अहमदपूर यांच्याकडे पत्र दिले आहे.

दरम्यान अहमदपूर तहसिल कार्यालयातून संबंधीत संचिका तब्बल दहा दिवस गायब होती.ही बाब लक्षात घेवून युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी तहसिलदार यांना निवेदन देवून या प्रकरणी प्रसंगी अंदोलन करण्याचे पत्र दिल्यानंतर सदरची गायब झालेली संचिका तहसिल कार्यालयात उपलब्ध झाली.तसेच स्थानीक अधिकार्यांना भेटून ही बाब त्यांना अवगत केली आहे. एकूणच राजकीय हेव्या-दाव्या पोटी तूर्त शहरातील स.नं.4 चे अतिक्रमण नियमानूकूल होवूच नये यासाठी कांही मंडळी प्रयत्नशिल आहेत. दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडून 500 चौ.फुटाच्या वरील क्षेत्राचे मूल्यांकन तहसिल कार्यालयाकडे दाखल करण्यात आले असल्याचे समजते.मात्र वेळोवेळी विनंती करून सूध्दा अद्याप संबंधीत लाभार्थ्यांना मूल्यांकन भरून घेण्या बाबतचे पत्र दिले नाही. शासन निर्णयान्वये अनूसूचीत जातीच्या लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमानूकूल करतानाची रक्कम माफ करण्यात आली आहे.त्यामुळे यादी प्रमाणे उर्वरीत सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देवून मूल्यांकन भरून घेणे गरजेचे आहे. या सर्व लाभार्थ्यांना कबालनामा दिल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूरीचे प्रस्ताव दाखल करावयाचे आहेत.अद्याप कबालनामेच दिले नसल्याने घरकूल मंजुरीच्या पुढील प्रक्रियेसाठी अडचण येत आहे. त्यामूळे अहमदपूर शहरातील स.नं. 4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी एकुण लाभार्थ्यांपैकी अनूसूचीत जाती-जमाती चे लाभार्थी वगळून इतर लाभार्थ्यांना मुल्यांकन भरण्याच्या नोटीसा विनाविलंब द्याव्यात तसेच शासकीय मूल्यांकन भरून घेवून कबालनामे देण्याची कार्यवाही कालमर्यादेत स्वरूपात करावी असेही पूढे नमूद करण्यात आले आहे.

संबंधीत अधिकार्‍यांनी तातडीने कार्यवाही करावी.!

या प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे अश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले होते.या संबंधी त्यांनी उपविभागीय अधिकारी,अहमदपूर तहसीलदार,अहमदपूर तसेच मुख्याधिकारी न.प.अहमदपूर यांना पत्र काढून लेखी सूचना दिल्या आहेत.

या निवेदनावर महिला व बालकल्याण सभापती सौ.तनूजाताई सूर्यवंशी, सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, शेख रहीम,नूर मोहम्मद,शेख मतीन, शेख दिलदार,शेख जब्बार शेख दस्तगीरभाई,शेख नजीर, शेख वजीर,शेख ताहर, शेख बालू, शेख आसीफ, शेख आजीम,शेख हाजी, शेख मोहम्मद,शेख फरीन, शेख सादीक, शेख रेहान,शेख रहीमभाई ईस्माईल, शेख सत्तारभाई, मनीयार जिलानी, मनीयार नन्हूभाई,शेख ईम्रान, पठाण ईम्रान, बानाटे नागनाथ, वाघमारे जगदीश, वाघमारे नंदू, बानाटे भिकाजी,बानाटे रामा यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद अहमदपूर, तहसिलदार अहमदपूर, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

About The Author