घरकुल लाभार्थ्याना योग्य तो न्याय द्यावा – प्रा. आण्णासाहेब मिरगाळे

घरकुल लाभार्थ्याना योग्य तो न्याय द्यावा - प्रा. आण्णासाहेब मिरगाळे

निलंगा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे नणंद येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शासनाकडून 240 घरकुलाची यादी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी जवळपास बत्तीस लाभार्थ्यांना घरकुल सर्वेक्षण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे. घरकुल लाभार्थ्यांची यादी मंजूर झाल्यानंतर ती ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व ग्रामसभेत वाचून दाखवली पाहिजे व कोणाचे आक्षेप असतील तर ते नोंद घेऊन त्यावर सर्व सदस्याच्या माध्यमातून चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, असा शासकीय नियम असतानासुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना न कळताच सर्वेक्षण केले. ज्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या नावावर 8 अ व खुली जागा असतानासुद्धा घरबांधकाम नसतानासुद्धा “पक्के घर” म्हणून असा शेरा कसा काय दिला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणाच्या सांगण्यावरून “पक्के घर” हा शिरा दिला ही संशोधनाची बाब आहे.तरी मेहरबान साहेबांनी प्रत्यक्षात येऊन घरकुल लाभार्थ्यांना घर आहे किंवा नाही, प्लॉट खुला जागा आहे की बांधलेला आहे, याची शहानिशा करून सर्व लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून द्यावे व खोटी माहिती आपल्या कार्यालयात जमा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे. सोबत शहर संघटक हरिभाऊ सगरे, नामदेव शिरसले, गोपाळ हिबारे, उत्तम शेळके, घरकुल लाभार्थी शिवगिर गिरी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author