संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 30 मार्च रोजी संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील इ. 6 वी ते 8 वीच्या वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना कोव्हँक्सीनचे व कार्व्होव्हँक्स चे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिराजदार सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले व मुख्याध्यापक आशाताई रोडगे यांनी लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या लसीकरणास आरोग्य सेविका निर्मला पारसे, हनमाबाई दुगाने व जनाबाई मोरे व मदतनीस भाईमारे स्वाती, शाळेच्या सहशिक्षिका सविता पाटील, रूपालीताई शिंदे, सतीश साबणे, संजीवनी गुरमे, शारदा तिरुके, त्रिगुना मोरगे, शबाना शेख, लिपिक बब्रुवान कलाले यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author