कांदलगांव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
पालम (गोविंद काळे) : तालुक्यातील कांदलगाव येथे या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सतत सात दिवस राम कथाचार्य ह.भ.प श्री श्रीकृष्ण महाराज आवलगावकर हे मार्गदर्शन करणार आहेत या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री राम कथा, गाथाभजन , हरिपाठ , किर्तन, हरिजागर, असे दैनदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १२ एप्रिल रोजी श्री.ह.भ.य. सुर्यभान महाराज आवलगांवकर १३ एप्रिल रोजी श्री.ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज आवलगांवकर १४ एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. रामभाऊ महाराज खोरसकर १५ एप्रिल रोजी ह.भ.प. शितलताई सुरनर महाराज अहमदपूरकर १६ एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. शिवशरण महाराज रटकळकर १७ एप्रिल रोजी ह.भ.प. प्रांजलीताई महाराज पानसरे आळंदीकर १८ एप्रिल रोजी श्री.ह.भ.प. तुळशिदास महाराज देवकर व श्री.ह.भ.प. कत्तारे महाराज डोंगरपिंपळा यांचे दुपारी २ ते ४ पुजेचे किर्तन होईल व रात्री ९ ते ११ ह.भ.प. शालिनीताई इंदोरीकर महाराज आळंदीकर१९ एप्रिल रोजी श्री.ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, नागपुरकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर श्री सोलपुरे रामलिंग मलीकार्जुन यांचा महाप्रसाद होईल. मंगळवार दि.१९ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणुक निघेल या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व भाविक मंडळीचे सहकार्य लाभणार आहे. गायनाचार्य सर्वश्री संगित विशारद सदगे पांडुरंग महाराज, भगवान महाराज इसादकर, मृदंगाचार्य श्री.ह.भ.प. सदगे महेश कैलासवाडी, धोंडगे कालिदास आवलगांवकर, शिंदे बापुराव नाव्हलगांव, शिंदे प्रसाद प्रल्हादराव नाव्हलगांवकर यांची सात दिवस उपस्थिती राहणार आहे व भजनी मंडळ नाव्हलगांव, नाव्हा, आडगांव, वनभुजवाडी, गणेशवाडी पुयणी, केरवाडी ससेच विशेष सहकार्य नाव्हलगाव सरपंच , नाव्हा सरपंच, आडगाव सरपंच, वनभुजवाडी सरपंच, गणेशवाडी सरपंच यांचे राहणार आहे. तरी कांदलगाव व परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामस्थांनी केले आहे .