मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. भारतीय राज्यघटनेत मोलाचे योगदान असल्यामुळे बाबासाहेबांना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने ओळखले जाऊ लागले. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो. बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते . यावेळी गणेश हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विध्यार्थानी भारतीय साविधानाचे वाचन केले.
यावेळी संचालक कुलदीप हाके ,संचालिका शिवालीकाताई हाके, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, आय टी आय चे प्राचार्य मदन आरदवाड, सुहास दहिटनकर, नारहारे, कदम,सिद्धू मासोळे,सतीश केंद्रे, संतोष होनमाणे आदी उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.