‘लातूर जिल्हा बँक आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत निराधारांनां घरपोच अनुदान वाटप

'लातूर जिल्हा बँक आपल्या दारी' उपक्रमा अंतर्गत निराधारांनां घरपोच अनुदान वाटप

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील संजय निराधार अनुदान योजना सर्व पात्र लाभार्थींना मिळणेसाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत. या अंतर्गतच लातूर तालुक्यातील भोयरा येथे पात्र लाभार्थीची निवड करण्यात आलेली आहे. या सर्वांना अडचणीच्या वेळी वेळेवर अनुदान मिळावे यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामिणचे आमदार आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बॅक आपल्या दारी उपक्रमाव्दारे भोयरा गावातील लाभार्थीना अनुदानाची रक्कम वितरीत केली.

दि. ११ मे रोजी सकाळी 11.00 भोयरा गावात बॅकेचे वाहन फिरते एटीएम आले. सर्व लाभार्थीना एकत्र करण्यात आले. गावातील 54 निराधारांना प्रत्येकी 4000 रु प्रमाणे रु, 2,16,000 वाटप करण्यात आले. गावातील लाभार्थीना उन्हाळ्यात बँकेत जाणे अवघड होत होते यामुळे अनुदान रक्कम गावातच मिळत असल्यामुळे सर्वांनी आनंदाचं व्यक्त केला आहे. या प्रसंगी बँक कर्मचारी जी.एस.ढगे, एस. बी.वाघडरे, भोयरा येथील सरपंच विजय सुर्यवंशी, श्रीमंत पाटील, बालाजी मस्के, रामलिंग दरेकर आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!