भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान जगात श्रेष्ठ – माजीमंत्री विनायकराव पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६६ वा सार्वजनिक जयंती सोहळा अहमदपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील हे होते ते आपल्या अध्यक्ष पदावरून भाषण करत असताना ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, या सर्व महाविभुतीने केलेल्या कार्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारत देशात क्रांती झाली आहे या लोकांनी समाजा समाजामध्ये एकी घडवण्याचे काम केले आहे समाज सुधारण्याचे काम केले आहे त्यांच्या कार्यामुळेच आज आपण विविध पदावर महिलांना विविध पदावर विविध प्रकारचे शिक्षण घेण्याची संधी यांच्यामुळेच आपल्याला मिळाली आहे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून मागासलेल्या लोकांना प्रकाशात नेण्याचे काम केले आहे त्यांच्या या कार्यामुळे हा समाज मोठमोठ्या पदावर आपली कामे करीत आहेत त्यामुळे आपल्या समाजातील युवकांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करण्याचे कार्य करावे व अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस करावे. भगवान गौतम बुद्ध यांचे पंचशिल 75% देशाने मान्य केले आहे म्हणून त्या देशात आज गौतम बुद्धाचा शांतीचा धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे तसाच बुद्ध धर्माचा प्रसार भारतात सुद्धा व्हावा असे आपण काहीतरी केले पाहिजे. म्हणून भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगात श्रेष्ठ आहे त्याला तोड नाही म्हणून आपण सर्वांनी बुद्ध धम्माचे पंचशीलाचे आचरण करावे. असे आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी भाषण केले. त्यानंतर भाजप प्रदेश किसान सभेचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख, रिपाइंचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, दलित नेते गोपीनाथ जोंधळे, डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, ओबीसी चे जिल्हाअध्यक्ष कलिमोद्दीन अहमद इत्यादी मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व सर्व महामानवाच्या कार्यावर आपले विचार मांडले.व सौ अंजलीताई वाघंबर यांनी उपस्थित सर्व उपासक-उपासिका यांना धम्मदेशना दिली. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील, उद्घघाटक बाबासाहेब कांबळे, पंचशील ध्वजारोहन हस्ते गोपीनाथ जोंधळे, स्वागताध्यक्ष कलिमोद्दीन अहमद व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपराव देशमुख.अमित रेड्डी. डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,ॲड. कोरे, शाहीर साबळे, अण्णाराव सूर्यवंशी, श्रीमती शकुंतलाबाई बनसोडे, अतुल ससाने, शेषराव ससाने, सौ मीरा ससाने, शीला शिंदे,प्रभाताई तिगोटे, उषा ससाने, इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, माधव जुबरे, शेख कलीम, अजय गायकवाड, संजय वाघंबर, रितेश वाघंबर, शेख बाबुभाई, अशोक सोनकांबळे दिलीप ससाने इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली ताई वाघंबर यांनी केले. तर आभार विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. दिवसभर शाहिर मनीषा लोखंडे व त्यांचा संच यांनी तथागत महामानव गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भीम गीतांचा कार्यक्रम दिवसभर झाला