वलांडी येथे महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचा मेळावा संपन्न
देवणी (प्रतिनिधी) : वलांडी येथे काॅंग्रेस अंतर्गत महिला संघटन मजबुत करण्या सोबत गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद होत्या.त्या मुळे प्राधान्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,ते नुकसान कसे भरून काढता येईल?या सोबतच पक्ष संघटन मजबुत कसे करता येईल?या उद्येशाने देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रदेश काॅंग्रेस महिला आघाडीचा मेळावा घेण्यात आला.
पक्ष संघटनेला मजबुत करावे,महिलांच्या माध्यमातून घराघरात काॅंग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची विचारधारा पोंहचवावी,यासाठी वलांडी येथील सौ .अनुसयादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या मुख्याध्यापिका कुसूमताई महावरकर यांची महिला शिक्षक काँग्रेस देवणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . मागील दोन वर्ष कोरोना काळात गेले आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्ष शाळेविना राहावे लागले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे .तसेच विद्यार्थ्यांची शाळेची सवय मोडल्यासारखी झाली आहे , त्यामुळे महिला शिक्षक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा मुख्याध्यापक कुसूमताई महावरकर यांनी विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेची सवय लागावी , तसेच शिक्षकांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी वलांडी येथे महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस मेळावा आयोजित केला होता .
यावेळी माजी आमदार धर्माजी सोनकवडे , जिल्हा शिक्षक काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण , जिल्हा अध्यक्ष शिक्षक काँग्रेस महिला आघाडी बालिका मुळे , जिल्हा शिक्षक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यकला थेटे,महिला आघाडी सरचिटणीस शितल सोनकवडे , देवणी नगरपंचायत चे नगराध्यक्ष किर्ती घोरपडे , सौ सोलापुरेताई एस व्ही ,औसा तालुका महिला शिक्षक अध्यक्षा आर्चना मेनगुले , उस्मानाबाद महिला जिल्हाध्यक्षा वैशाली महावरकर, वलांडी सरपंच आडेप्पा रामभाऊ भंडारे, देवणी स्वच्छता अधिकारी खंडारे ए एस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासंदर्भात व शिक्षकांच्या शैक्षणिक अडचणी या विषयावर सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्या संदर्भात सविस्तर विचार विनामय करण्यात आला .
