हिप्परसोगा सोसायटीवर स्वयंप्रभाताई पाटील यांच्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

हिप्परसोगा सोसायटीवर स्वयंप्रभाताई पाटील यांच्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक स्वयंप्रभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे सर्व बारा उमेदवार विजयी झाले आहेत.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या हिप्परसोगा सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत स्वयंप्रभाताई पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत विरोधकांचा सुकड़ा साफ केला. त्यांच्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनल मधुन सर्व साधारण मतदार संघातून स्वतः स्वयंप्रभाताई पाटील, चंद्रशेखर सोमवंशी, धोंडीराम आळंदकर, भगवान आळंदकर, भारत आळंदकर, अमोल पाटील, विठ्ठल सोमवंशी, राम संपते, महिला मतदार संघातुन यादव सुवर्णा, पार्वती सोमवंशी, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून नागनाथ मुस्के, व अनुसूचित मतदारसंघातुन दामु चित्तापुरे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत निर्णयाधिकारी सौ. मनिषा कातरे यांनी कामकाज पाहिले या सर्व विजयी उमेदवारांची गावात डॉल्बी लावून जल्लोषात भर पावसात मिरवणुक काढण्यात आली.

हिप्परसोगा सोसायटीवर स्वयंप्रभाताई पाटील यांच्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्वयंप्रभाताई पाटील यांनी गेल्या 15 वर्षात सोसायटीच्या माध्यमातून लाखावरील उलाढाल कोटीवर नेत स्वकीय किंवा विरोधक असो सर्वांना समान वागणुक देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता केलेल्या कामाची पावती मतदारांनी मतदानांतुन दिली आहे. औसा तालुक्यातील देशमुख परिवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या झुंजार महिला नेतृत्वाला विजयी केले त्याबद्दल त्यांनी समस्त गावकऱ्यांचे आभार मानले. या सोसायटी निवडणुक प्रक्रियेत हिप्परसोगा येथील समस्त ग्रामस्थ लहान थोर महिला व तरुणी युवक आदी सर्वानी अथक परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!