शिक्षक संघटनेच्या वतीने उर्दू शिक्षक मेळावा संपन्न
उदगीर : उदगीर येथे ऑल इंडिया आयडीयल टिचर्स असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या अपणा मकाम पैदा कर या राज्यस्तरीय मोहीमेच्या निमित्ताने दक्कन उर्दू प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे उर्दू शिक्षक मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रईस महाविद्यालय मुंबई येथील प्राचार्य व शिक्षण तज्ञ जीयाऊर्रहेमान अन्सारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे, हाश्मी मीर मुजाहेद अली यांची प्रमुख उपस्थिती होती.
आधुनिक शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांना समावून घेण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांकडे लक्ष घालून शिक्षण द्यावे व तसेच विद्यार्थी कितपत समजतो व काय समजतो याकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे. असे यावेळी केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांना सखोल असे मार्गदर्शन केले.
ऑल इंडिया आयडीयल टिचर्स असोसिएशन उदगीर शाखेचे सचिव अझरोद्दीन शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी दायमी अब्दुल रहीम यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
मोमीन मुजीब, हाश्मी वसी,शेख आय.जी,मिर्झा जबिउल्लाह,आखिल शेख, अन्वर हुसैन,फारुकी रियाज, शेख मुशिर, घासी युसूफ,हाश्मी शोएब,शेख नवीद,शेख रिजवान,आदींनी परिश्रम घेतले.