विकासाची क्षमता पाहून जनतेने निवडून दिले याची जाण ठेवेन आ. संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाची क्षमता विचारात घेऊन मला विजयी केले आहे याची जाणीव मला कायम आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणे आणि विकासाचा नवा पॅटर्न रचने हेच माझे कर्तव्य आहे ही जाणीव ठेवूनच मी काम करत आहे गेल्या अडीच वर्षात प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे त्यासोबतच उदगीर विधानसभा मतदारसंघाला सर्वच विभागीय कार्यालय आली पाहिजेत प्रशासकीय इमारती मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आपले कार्य चालू असून विकासाची गती घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनीही पाठबळ दिले आहे असे उद्गारआ. संजय बनसोडे यांनी काढले ते उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील तालुका अध्यक्ष शिवाजीराव मुळे बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेंगे टोल शिवसेनेचे विधान सभा प्रमुख श्रीमंत सोनाळे व्यंकटराव पाटील अवलकुंडकर देविदास कांबळे समीर शेख मंजूर खा पठाण मुकेश भालेराव उदय मुंडकर अरविंद बिरादार दिलीप मटके सुधाकर बिरादार सार्वजनिक बांधकाम खात्याचे डेप्युटी इंजिनियर एल डी देवकर वाघमारे कांबळे शंकर जाधव इत्यादी प्रमुख उपस्थित होते याप्रसंगी पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक कार्यालय लातूरला तर दुसरे कार्यालय निलंगाला होते तसे ते कार्यालय उदगीर साठी मंजूर झाले होते मात्र तत्कालीन नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ते कार्यालय निलंगा येथे सुरू केले होते त्यामुळे उदगीर अहमदपूर जळकोट चाकूर या तालुक्याची मोठी गोची निर्माण होत होती हे लक्षात आल्यानंतर उदगीर साठी म्हणून स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू केले पाहिजे याची जाण निर्माण झाल्यामुळे आपण पाठपुरावा केला आणि सुदैवाने 12 फेब्रुवारी 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेऊन मान्यता दिली आणि जवळपास सात कोटी रुपये या इमारतीसाठी मंजूर केले त्यासोबतच जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहनिर्माण व्हावे यासाठी आपण प्रयत्न केले आणि सुदैवाने त्याचाही भूमिपूजनाचा सोहळा आजच सुरू होतो आहे असेही माहिती या प्रसंगी आमदार संजय बनसोडे यांनी दिली उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांना जल मिशन या ग्रीड योजनेअंतर्गत पाणी उपलब्ध होणार आहे उदगीर शहरालाही लिंबोटी धरणाचे पाणी लवकरच सुरू होईल अशी माहिती देतानाच उदगीर येथील पोलीस क्वार्टर साठी आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी 70 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती या प्रसंगी आमदार संजय बनसोडे यांनी दिली तेरू नदीच्या बेरीज ची उंची वाढवल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे तलावात जलसाठा वाढल्यामुळे हरितक्रांती होऊ शकेल अशीही माहिती आमदार संजय बनसोडे यांनी दिली याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगे टोल बसवराज पाटील राजेश्वरी नीटुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील शिवाजीराव मुळे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शाम ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमंत सोनाळे यांनी मांडले.