संवेदनशील शहर हा डाग पुसून काढा आणि साहित्य नगरी असा उल्लेख होऊ द्या – आ.संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहराला संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते, 1992- 93 च्या प्रकरणात दंगल झाली होती. तोच संदर्भ कायम ठेवत उदगीर शहराला संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. आताही शहर संवेदनशील शहर नसून साहित्य नगरी बनले आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळांनी सांस्कृतिक एकोपा वाढविणारे उपक्रम राबवावेत. अतिशय उत्कृष्ट देखावा दाखवणाऱ्या गणेश मंडळास आमदार फंडातून 11 लाख रुपये, पाच लाख रुपये, तीन लाख रुपये असे बक्षीस त्या त्या प्रभागाला दिले जाणार आहे. शांततेला गालबोट न लागू देता गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले.
याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहराचे नावलौकिक वाढवणारे उपक्रम राबवा. गुन्हेगारी मुक्त शहर आणि उत्सव असे स्वरूप या गणेशोत्सवाला लाभावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष गुलाब पटवारी, अमोल बाहेती, दत्ता पाटील, आशिष अंबरखाने, पंडित सुकनिकर, हबिब राजा पटेल, रमेश अण्णा अंबरखाने, ताहेर हुसेन, राजेश्वरी नीटुरे, बसवराज पाटील, मनोज पुदाले, डॉक्टर दत्ता पवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगेशेट्टी, रामेश्वर गोरे, माजी नगराध्यक्ष बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, सहयोग अर्बन बँकेचे चेअरमन रमेश अण्णा अंबरखाने, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, आजोबा गणपतीचे अध्यक्ष सुरेश कुरूपखेळगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, प्राध्यापक डॉक्टर मल्लेश स्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य रीतीने पालन केले जावे. उत्साहात गणेशोत्सव साजरा करा. मात्र डीजेवर प्रेम करण्याऐवजी झाडावर प्रेम करा, जिथे जागा असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करा. प्रत्येक गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावावीत, असे आवाहन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ.मलेश झुंगा स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन पो.नी दीपककुमार वाघमारे यांनी केले.