गावच्या वळूला चोरटे पळून नेताना ग्रामस्थांकडून चोरट्यांचा बंदोबस्त
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखले जाणारे सोमनाथपूर येथील ग्रामस्थांनी देवाला सोडलेला नंदीबैलास अर्थात वळूला उदगीर येथील काही अनोळखी इसम त्या नंदीबैलास पकडून कत्तलखान्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना गावातील तरुणांनी त्या चोरट्यांना टेम्पो सह पकडले. टेम्पो क्रमांक एम एच 24 /ए यु 3235 ग्रामपंचायत कार्यालयात जमा केले. आणि यासंबंधी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी सरपंच राम पाटील व गावातील मंडळी गेले असता, पोलिसांनी तक्रार घेतली नाही.
वास्तविक पाहता चोरट्यांनी नंदीबैलाला टेम्पोमध्ये घालताना जबर मारहाण करून एक डोळा फोडला आहे. सदरील नंदीबैलास चोरून नेणाऱ्या चोरट्यावर गोहत्या बंदीचा गुन्हा दाखल करावा. आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागनी सोमनाथपुर ग्रामस्थांची आहे. मात्र पोलीस यासंदर्भात का टाळाटाळ करत आहेत? हे एक कोडेच आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांचे कर्तव्य असताना देखील या ठिकाणी मात्र नेमके उलटे होताना दिसत आहे. या चोरट्यांना पोलिसांचे अभय आहे की काय ?अशी शंका ग्रामस्थ घेत आहेत.
सध्या गणेशोत्सवाचे दिवस येत असल्याने आणि हिंदू धर्मामध्ये वळूला जास्त महत्त्व असल्याने त्याच्याशी निगडित धार्मिक भावना जास्त महत्त्वाच्या असतात शासनाने गोवंश हत्याबंदी केलेली असताना देखील पोलीस मात्र चोरट्यांना का सवलत देत आहेत असा प्रश्न सोमनाथपूरची जनता करत आहे.