भक्ती मार्ग मानवी जीवनात संस्कार केंद्र होणे गरजेचे – आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रत्येक कुटुंबातील स्त्री-पुरुष सदस्य कामाच्या व्यापात व्यस्त असल्याचे सांगून तो सुखाच्या शोधात भक्ती मार्गाकडे वळल्याचे मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे मानवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भक्तिमार्ग, मानवी जीवनात संस्कार केंद्र बनले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.
तेथील गौरीशंकर मंदिरात श्रावण मासानिमित्त पंचाक्षरी जपाच्या समारोपप्रसंगी आशीर्वचन पर बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक राहुल शिवपुजे, अभय मिरकले, रविशंकर महाजन, गुंडपा तत्तापुरे, नारायण काळे, राजकुमार कल्याणी सह मान्यवर उपस्थित होते.यावेळी आचार्य गुरुराज स्वामी पुढे बोलताना म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये सर्व मासापेक्षा श्रावण मास पवित्र असल्याचे सांगून या पवित्र महिन्यामध्ये परमेश्वराची ध्यानधारणा, मनन, चिंतन करावे, आपल्या परिवारातील आई-वडील आणि ज्येष्ठांची मनोभावे सेवा करा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव ढेले यांनी सूत्रसंचलन संदीप शिंदे यांनी तर आभार सुनील तत्त पुरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी मनमत शिवपुजे, धर्मराज चावरे, रामलिंग तत्तापूरे, सुभाष लांडगे, अनिल कासनाळे, सतीश लोहारे सह मान्यवर समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कररडखेले, सुनील शेटकार, माधव भोसकर, विकास शेटकर सह गौरीशंकर मंदिर संस्थांच्या सदस्यांनी व महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.