भारत सरकारकडे महात्मा फुले महाविद्यालयाची मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

भारत सरकारकडे महात्मा फुले महाविद्यालयाची मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारताचे महान खेळाडू, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार पुढील एक वर्षाच्या आत प्रदान करण्यात यावा अन्यथा पुढील लढा सनदशीर मार्गाने अवलंबला जाईल पर्याय असा महाविद्यालयातील क्रीडा विभागासह व सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कडून बहुमताने ठराव पारित करण्यात आला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाद्वारे आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरव करावा असा प्रस्ताव मांडला. त्यास, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अनुमोदन दिल्यानंतर प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने हा सर्वानुमते ठराव पारित करून संबंधितांना तातडीने निवेदने देण्याचे ठरले. एक वर्षाच्या आत शासनाने मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’पुरस्कार देऊन सन्मानित करावे. अन्यथा नाही मिळाला त्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचेही या वेळी सर्वानुमते ठरले. या प्रसंगी क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान यावर प्रकाश टाकला. तर, अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा विश्वातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मांडले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. पी.पी. चौकटे, डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author