शेकापूर येथे पिक कर्ज वितरणाच्या संदर्भात बैठक संपन्न

शेकापूर येथे पिक कर्ज वितरणाच्या संदर्भात बैठक संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील शेकापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर अमित चंदन तसेच दीपक केंद्रे, कर्मचारी सूर्यकांत यांनी शेकापूर येथील हनुमान मंदिराच्या ठिकाणी ग्रामस्थांची बैठक घेऊन नवीन पीक कर्ज वाटप संदर्भात व पीक कर्जाच्या नूतनीकरणाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या अनुषंगाने प्रोत्साहन देण्यात आले. याप्रसंगी शेकापूर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी भालके तसेच जनार्दन सावंत, हलकरे प्रसाद यांच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेकापूर सारख्या छोट्याशा गावात देखील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना कर्ज देण्याच्या संदर्भात गावकऱ्यांशी बँक व्यवस्थापनाने सविस्तर चर्चा केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!