शिक्षकांचा सन्मान हा द्वारकादास शामकुमारचा वेगळा पॅटर्न

शिक्षकांचा सन्मान हा द्वारकादास शामकुमारचा वेगळा पॅटर्न

लातूर (प्रतिनिधी) : कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर शुन्यातून विश्व निर्माण करणारे कपडे विक्रीत आगळा-वेगळा ठसा उमटवणारे द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी शिक्षकांविषयी आदरभाव ठेवन शिक्षकांचा सन्मान केला हा त्यांचा वेगळा पॅटर्न आहे, असे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त द्वारकादास शामकुमारच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळा व संवाद कार्यक्रम दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात उत्साहाच्या वातावरणात झाला. अध्यक्षस्थानी आमदार विक्रम काळे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय शिक्षण उपसंचालक ड.ॉ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले, शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. शिक्षकांचा शैक्षणिक क्षेत्राबाहेरील व्यक्तींनी सन्मान करुन शिक्षण क्षेत्राविषयी आदरभाव व्यक्त करावा, हे तुकाराम पाटीलच करु शकतात.

चेह-यावर विविध प्रकारचे क्रिम लावून चेहरा गोरा-गोमटा करण्याचा प्रत्यत्न प्रत्येकांकडून होत असतो. त्याने चेहरा खराच गोरागोमटा होतो काय?, हा वेगळा विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने चेहरा गोरागोमटा करण्याच्या प्रयत्नापेक्षा आपले मन शुद्ध, चांगले, इतरांविषयी आदर व्यक्त कराणरे असावे, असे यावेळी बोलताना सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या.

About The Author

error: Content is protected !!