जैविक शास्त्रातील संशोधन संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- पूजा चटर्जी
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.दत्ता पाटील, प्राचार्य धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर हे होते. साधन व्यक्ती म्हणून पूजा चटर्जी, संशोधक जैविकशास्त्र विभाग,भुवनेश्वर ह्या होत्या, त्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या आयआयटी, जॅम, सीएसआर, डीबीटी, जीआरएफ, गेटएक्सेल व डब्ल्यूबीसेट इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. आपल्या संभाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, विविध स्पर्धा परीक्षा जसे की आयआयटी, जाम, टीआयएफआर, आयआयएससी, सीयुसेट इत्यादी परीक्षा साठी प्रयत्न करावेत. तसेच जैविक शास्त्रात संशोधनातून विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा लाभ घ्यावा.
प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी संशोधन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला चांगले वळण देऊ शकते, असे नमूद केले. तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य संदीकर यांनी विद्यार्थ्यांनी जैविक संधीचा लाभ घेतल्यास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, असे सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक राज्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉआर.बी.अलापुरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.आर.के. नारखेडे यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.जे.एम.पटवारी, प्रा.डॉ.बी.एस.कांबळे, प्रा.डॉ.पी.एस.शेटे, प्रा.आर.डी. जोशी आणि प्रा.ए.एम.भताडे यांनी प्रयत्न केले.