जनसेवा हीच ईश्वर सेवा – सुकनिकर
उदगीर (प्रतिनिधी) : गोरगरीब जनतेची सेवा करणे आणि अडचणीच्या काळात त्यांना मदतीचा हात देणे हीच खर्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. आपल्याकडे जे आहे, आणि आपण ते देऊ शकतो. ते इतर गरजूंना देण्यात धन्यता असते. असे विचार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकनिकर यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील विविध प्रभागातील पालीत राहणारे किंवा उघड्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना ब्लॅंकेट, शाल वाटप करताना कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. स्वतः सुकनिकर हे मध्यमवर्गीय असून देखील आपल्या ऐपतीप्रमाणे यांनी वेळोवेळी सामाजिक जाणीवा जपत गोरगरिबांना मदत केली आहे. कोरोना काळात गरिबांना अन्नधान्याची किट वाटप करणे, सॅनिटायझर चे वाटप करणे, अपंगांना अत्यावश्यक असणाऱ्या अवयवाचे वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना संपर्क साधून अपंग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील दूत बनवून त्यांनी शेकडो अस्थिव्यंग असलेल्या तरुणांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले आहेत.
कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ गरिबांना मदत व्हावी. हा उदात्त हेतू ठेवून त्यांनी हे समाजकार्य केले आहे. स्वतः कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर आपण या समाजाचे काही देणे लागतो. अशा आदर्शवादी विचारांची जपणूक करत त्यांनी समाजसेवा सुरू केली आहे. त्यांच्या या उदात्त सेवेबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.