कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळा – मुख्याधिकारी भारत राठोड
उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या कोरोना च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली असून जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना, डेल्टा, ओमायक्रोन त्यापाठोपाठ आता नव्याने डेल्टाक्रोन हा नवा व्हेरीअँट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांसाठी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.
तसेच ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी. असेही त्यांनी सांगितले आहे. व्यापारी वर्गाने लस न घेता व्यापार सुरू केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचाही सूचना केल्या आहेत. मास्क चा नियमित वापर, गर्दी टाळणे, सतत हात धूत राहणे, सॅनिटायझर चा योग्य वापर हे सर्व नियमितपणे करावे. सामाजिक अंतर पाळले जावे. अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. स्वतःची काळजी घ्या, तसेच समाजाची काळजी घ्या. असेही भारत राठोड यांनी सांगितले आहे. ज्यांनी या सूचनांचे पालन केले नाही अशा 52 व्यक्तीच्या विरोधात सरळ सरळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्हाभरात 52 व्यक्तींच्या विरोधात 23 गुन्हे दाखल झाले आहेत. या 52 व्यक्तीच्या विरोधात कलम 188, 269, 270 भारतीय दंड विधान संहिता यासोबतच कलम 51( ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 11, महाराष्ट्र covid-19 उपाययोजना अधिनियम 2020, कलम 2,3,4 साथीचे रोग अधिनियम तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सात गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तसेच गांधी चौक, मुरुड, एमआयडीसी, गातेगाव, औसा, पोलीस स्टेशन येथे दोन, किल्लारी, निलंगा, कासार सिरसी, देवणी, उदगीर ग्रामीण, किनगाव, रेनापुर पोलिसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. विनाकारण भटकंती टाळावी, स्वयंस्फूर्तपणे नियमांचे पालन करावे. ज्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसेल. अशाही सूचना मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर उदगीर शहरातील अनेक दुकानात जाऊन प्रत्यक्ष व्यापाऱ्यांनी लस घेतली किंवा नाही? याचीही पाहणी त्यांनी केली आहे. यासोबतच शहरांमध्ये हा संसर्ग पसरणार नाही याची दक्षता घेत स्वतंत्र पथकाची ही नेमणूक केली आहे. नागरिकांनी दंडात्मक कारवाईच्या अगोदरच उपाययोजना करून सहकार्य करावे. असेही भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. सद्यस्थितीत सण, उत्सव असल्यामुळे नागरिकांची बाजारात गर्दी होते आहे. ही गर्दी टाळून सामाजिक आंतर पाळले जावे. सण उत्सवाच्या दरम्यान देखील काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी. सामाजिक बांधिलकी जोपासावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.