जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन मध्ये रंनिग क्लब अहमदपूर रनर ने सातार्यात अहमदपूर पॅटर्न गाजविले
अहमदपूर (गोविंद काळे) : सप्टेंबर २०२२रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन पार पडलेली.या मॅरेथॉन मध्ये देशभरातुन जवळपास ८००० रनर्स नी भाग घेतला होता. हि मॅरेथॉन सातारामधुन पोलीस परेड ग्राउंड ते प्रसिद्ध कास पठाराच्या घाट माथ्यापर्यत होते.सुरुवातीचे १०.५ कि.मी हे घाटातला तीव्र चढ व १०.५ कि.मी. तसाच उतार याप्रमाणे २१ कि.मी रनिंग करुन दिलेल्या कट ऑफ टाईम च्या आत हि स्पर्धा पुर्ण करायची असते.गोल्ड मेडल साठी २ तास कट ऑफ टाईम असतो, सिल्वर मेडल साठी २.३० तासाचा कट ऑफ टाईम असतो तर ब्रांन्झ मेडल साठी ४ तासाचा वेळ असतो.अहमदपुर ग्रुप मधून शेख लुल्ला छटुसाब यांनी १ तास ५७ मि. हे खडतर आव्हान पुर्ण करत गोल्ड मेडल पटकावले . श्री दिपक वलसे सर यांचे काहि सेकंदामुळे गोल्ड मेडल पदक हुकले त्यांनी 2 तास 42 सेकंदात पुर्ण करुन सिल्वर मेडल मिळवले. श्री धनंजय तोकले यांनी 2 तास 06 पूर्ण करून सिल्वर मेडल मिळवले, श्री वेदांत राठोड 2 तास 08 मि पूर्ण करून सिल्वर मेडल मिळवले व श्री नामदेव बरुरे यांनी 2 तास 12 मि.पूर्ण करून सिल्वर मेडल मिळवले व तसेच मिसंजय सरकाळे,संभाजी चोपणे,सतिश बैकरे,मनोहर नारागुडे यांनी २.३० तासाच्या आत हि मॅरेथॉन रन पुर्ण करुन सिल्वर मेडल पटकावले. त्याच बरोबर श्री हनुमंत सुडे,पल्लवी वलसे,देवानंद वानखेडे ,प्रदिप फुलसे,बालाजी पडिले,तुकाराम उगीले यांनी आपला बेस्ट टाइम देत ३ तासाच्या आत खडतर आव्हान पुर्ण करत ब्रान्झ मेडल बहुमान मिळवला. या खडतर सातारा मॅरेथॉन ची तय्यारी अहमदपूर ग्रुप ने टेंबी नाका रोड ते जवळगा या चढ उतार असलेल्या ठिकाणी केली. अहमदपूर रंनिग क्लब अहमदपूर व आयुष्मान योगा ग्रुप अहमदपुर च्या या कामगीरीवर अहमदपूर पर्टन चे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
