मनसे नळगीर विभागाध्यक्ष पदी परमेश्वर भोसले यांची नियुक्ती
उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी जि. प., प. स. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय कार्यकर्त्यांना तालुका स्तरावरील पदे देऊन पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकडे उदगीर मनसेने पावले उचलली आहेत. सक्रिय कामात सहभाग घेऊन राज ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याची धडपड असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे.
त्याच अनुषंगाने पक्षाच्या नळगीर विभागाध्यक्ष पदी परमेश्वर भोसले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राज ठाकरे यांच्या आदेशाने,प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे , तालुका उपाध्यक्ष संग्राम केंद्रे , शिवाजी पाटील,ज्ञानेश्वर वाघमारे,कृष्णा कोठारे,पिंटु कोयले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
