पाणी पुरवठ्यासाठी 16 कोटी मंजूर मलकापूरचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी मिटणार – संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : मलकापूर गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायम स्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी 16 कोटी रुपयाची निधी मंजूर केला असुन यापुढे मलकापुरवासियांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे असे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
एस.टी.काॅलणी नळेगाव रोड मलकापुर येथे आमदार निधीतुन पंधरा लक्ष रुपयाचे विठ्ठल रुक्मीणी मंदिर सभागृहाचे भुमिपुजन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्राची भालेराव हे होते तर प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच सिध्देश्वर पाटिल,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवकर,प्रा.डाॅ.मल्लेश झुंगा स्वामी,शेख समिर,बालाजी बोबडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजा व आरती करुन श्रीफळ फोडून सभागृहाचे भूमीपुजन केले.
प्रास्ताविकात सिध्देश्वर पाटिल यांनी मलकापुर ग्रामपंचायत हद्दित माजी मंत्री संजय बनसोडे यांनी कधी नव्हे एवढा विविध विकास कामासाठी विविध योजनेतून विस कोटी पाच लक्ष रुपयाचा निधी दिल्याबद्दल ग्रामपंचायत च्यावतीने आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी राज्य मंत्री आ.संजय बनसोडे म्हणाले की लोकप्रतिनिधी हा लोकसेवक असतो लोकप्रतिनिधी जागता असला पाहिजे ,अश्या लोकांना संधी दिली तरच प्रगती करता येते
पद हे काम करण्यासाठी असतात मिरवण्यासाठी नसतात
जोपर्यंत नौकर म्हणून ठेवाल तो पर्यंत जनतेची सेवा करत राहणार असल्याचे सांगून सिध्देश्वर पाटिल खर्या अर्थाने लोकसेवक म्हणून कार्यकरत आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण सिध्देश्वर उर्फ मुन्ना हे आहेत असे सांगून मुन्ना पाटिल यांच्या कार्याचे कौतूक करुन म्हणाले की मी मलकापूरचा आता रहिवासी आहे त्यामुळे या गावच्या सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.या प्रसंगी बालाजी बोबडे प्रा.मल्लेश झुंगास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन नंदकुमार पटणे यांनी तर आभार ग्रामसेवक संतोष पाटिल यांनी मानले.
कार्यक्रमास ग्रा.प.सदस्य गुरुनाथ बिरादार,सदस्या सौ.खताळ श्रीमती नळगिरे, शिवलिंग मुळे, ज्ञानेश्वर सावळे, राहूल पाटिल,माधव हलगरे यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते