माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरात देवीची केली महापूजा

माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरात देवीची केली महापूजा

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी शहरातील गांधी चौक येथील महालक्ष्मी देवी मंदिरात नवरात्र महोत्सव निमीत्ताने महापूजा करण्यात आली यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव, काँग्रेसचे मीडिया जिल्हाध्यक्ष हरीराम कुलकर्णी जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजीराव सुळ, शहर काँग्रेस सचिव शिवाजी कांबळे, कावळे, महालक्ष्मी मंदिराचे संचालक राजकुमार झिपरे , तुकाराम साठे माजी नगरसेवक विष्णू भाऊ तिवारी, मन्मथ हुचे, दत्तोबा झिपरे, रेवण साठे, रामभाऊ अपूने, सोमनाथ कद्रे, बबन भास्कर, सुभाष हूच्छे, बालाजी झिपरे आदि मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा संस्थानच्या वतीने सन्मान

महालक्ष्मी मंदीर संस्थानच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना नुकताच संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात संस्थेचा देशपातळीवरील सहकारातील नेतृत्व हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विश्वस्त मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देवी ची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात सत्कार करण्यात आला.

जुन्या आठवणींना दिला उजाळा

यावेळी महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी मंदीर परिसरातील पाहणी केली जुन्या आठवणींना उजाळा दिला २५ वर्षापूर्वी चे मंदिर व आताचे मंदीर यात खुप छान बदल झाला आहे अनेक जूने जेष्ठ नागरिक विश्वस्त यांची भेट झाली अनेकांची साहेब यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करत याबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला मंदीर परिसरातील विकासाच्या बाबतीत कौतुक केले..याप्रसंगी गांधी चौक परिसरातील व्यापारी, नागरिक दुकानदार, जेष्ठ नागरिक भाविक उपस्थित होते.

About The Author