डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मनपा आयुक्तांना निवेदन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक पार्क चे सुशोभीकरण करण्याकरिता दोन वेळा टेंडर काढून निवेदनादा मागविण्यात आल्या व भुमिपुजन होऊनही रद्द करण्यात आले. यासाठीचा निधी उपयोगात न आणता जाणीवपूर्वक श्रेयासाठी व राजकीय अनास्थेमुळे काम रखडले आहे.

याबाबत अनेक आंबेडकरी जनता, विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी आंदोलन केली आहेत. परंतु त्याकडे वारंवार साफ दुर्लक्ष करण्यात आले असून लातूरकरांत विशेषतः आंबेडकरी जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे. एप्रिल – मे महिन्यात माजी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकार व डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या शिष्टमंडळासमक्ष लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पार्कचा नकाशा जाहिर करून नागरिकांच्या सुचना मागवा असे सुचित केले होते.परंतु अद्यापही लातूर शहर महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात नाही.आगामी आठवड्यात जर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुशोभीकरण करण्यात आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

About The Author