लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शारदोत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विद्यार्थ्यांचे समुपदेशन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय येथे शारदोत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.सर्वप्रथम शारदा माता व महर्षी योगी अरविंद यांच्या प्रतिमा पूजनाने शारदोत्सवाची सुरुवात करण्यात आली. विविध गोंधळगीत सादर करण्यात आले.याप्रसंगी बोलताना अश्विनी देशमुख यांनी नवरात्रीचे महत्त्व सांगत आदिशक्तीचे महत्त्व विशद केले. अनेक कथा सांगितल्या.अध्यक्षीय मनोगतात कृष्णा मारावार यांनी स्त्री- शक्तीचे महत्त्व सांगत घरोघरी ज्योती स्वरूप स्त्रिया घर प्रकाशित करत असल्याचे सांगितले. प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीती शेंडे यांनी केले. स्वागत व परिचय रागिणी बरदापुरकर यांनी केले. सूत्रसंचलन ल.मा. चव्हाण यांनी केले तर आभार आशा कल्पे यांनी केले. याप्रसंगी संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गोंधळ गीते सादर केली. पूजा खरोबे हीने जोगीनीच्या वेशभूषेत देवीचे स्तोत्र सादर केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, ज्ञानोपासक मंडळ प्रमुख आशा कल्पे,व कलोपासक मंडळ प्रमुख शेंडे प्रीती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,कार्यवाह तथा केंद्रीय सदस्य शंकरराव लासूने,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हूरदळे, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, ज्ञानोपासक मंडळ प्रमुख आशा कल्पे यांनी शुभेच्छा दिल्या.