अभ्यासात केलेली गुंतवणूक भविष्यात यश मिळवून देते – गुलाम मेहबूब गलेकाटू

अभ्यासात केलेली गुंतवणूक भविष्यात यश मिळवून देते – गुलाम मेहबूब गलेकाटू

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील उर्दू विभाग अंतर्गत उर्दू अभ्यास मंडळाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ.आर.एन.लखोटीया हे होते, प्रमुख पाहुणे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक गुलाम मेहबूब गलेकाटू व ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार हे होते. यावेळी उर्दू विभाग प्रमुख डॉ. हामिद अश्रफ यांनी उर्दू अभ्यास मंडळाचे कार्य आणि विभागाची माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत करून उर्दू विभागाचे अभिनंदन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना निवृत्त पोलिस निरीक्षक गुलाम मेहबूब गलेकाटू यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व सांगून उदयगिरीचे माझ्या यशातील स्थान किती महत्वाचे आहे, हेही सांगितले.
डॉ.पेन्सलवार यांनी स्पर्धा परीक्षा आणि आजच्या तंत्रज्ञानविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ.आर.एन.लखोटीया यांनी शिस्त आणि अभ्यास याची सांगड घालणे महत्वाचे आहे असे सांगितले. यावेळी हाशमी आबुल आला, डॉ.अब्दुल बारी, बडेघर मंजूर अहमद, अ‍ॅड. वसिम अहमद, कालिम अहमद, खादरी खाजा तसेच उर्दू विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मकबुल अहमद यांनी केले, पाहुण्याचा परिचय प्रा.खुरेशी जैतूनबानु यांनी करून दिला, सूत्रसंचलन शेख सलमा बेगम यांनी केले. तर आभार सय्यद कामरान यांनी मांडले.

About The Author