सिद्धी शुगर कडून दसरा सणासाठी तिसरा हत्या पोटी रक्कम बैंक खात्यावर जमा – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजनास्थित सिद्धी शुगर कारखान्याकडून दसरा सणासाठी शेतकऱ्यांना 100/ रुपये प्रती मे. टन प्रमाणे तिसरा हत्या पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दि. 28 सप्टेंबर रोजी रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. गळीत हंगाम 2021-22 मध्ये गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या रक्कमेच्या एफ.आर.पी पोटी पहिला हप्ता रु.2000/ – प्रती मे.टन या प्रमाणे यापुर्वी शेतकऱ्यांना रक्कम अदा केलेली आहे . दुसरा हप्ता दि. 20 ऑगस्ट रोजी रु.200 /- प्रती मे . टन प्रमाणे रक्कम वर्ग करण्यात आली होती. तसेच तिसरा हप्ता रक्कम रु. 237.76 / – प्रती मे . टन होत असुन सिद्धी शुगर कारखान्याची एकूण एफ.आर.पी रु .2437.76/ – प्रती मे. टन इतकी आहे. देय रक्कमे पैकी रु. 237.76/- प्रती मे. टन पैकी दसरा सणासाठी दि . 28 सप्टेंबर रोजी रु.100/ प्रती मे.टन या प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम अदा केली आहे व दिवाळी सणासाठी 10 ऑक्टोबर पूर्वी राहिलेले रु .137.76 /- प्रती मे.टन रक्कम ( एफ.आर.पी ) अदा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तरी, शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन सिद्धी शुगर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कारखाना सभासदांना दिपावली 2022 सणानिमित्त शेअर्सच्या प्रमाणात रक्कम रु.25/- प्रती किलो या दराने साखर शनिवार दि .01.10.2022 ते शुक्रवार दि .07.10.2022 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत शेती विभागीय कार्यालयामध्ये वाटप करण्यात येणार आहे. तरी साखर घेण्यास येतांना आपले ओळखपत्र/आधार कार्ड, शेअर्स रक्कम भरलेली पावती सोबत घेऊन यावी असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. दसरा व दिवाळी सणासाठी सभासद शेतकऱ्यांना योग्यवेळी रक्कम व सवलतीच्या दरात साखर उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे .