अतिवृष्टीमुळे घरपडझड झालेल्या १० कुटुंब धारकांना प्राथमिक स्वरूपात धनादेश वाटप
चाकूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय येथे जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे घरपडझड झालेल्या ५२ घर कुटुंब धारकांना प्रत्येकी ६ हजार रुपयांचा धनादेश आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी प्राथमिक स्वरूपात १० कुटुंब धारकांना धनादेश प्रदान करण्यात आला.
प्रसंगी तहसीलदार शिवानंदजी बिडवे, नायब तहसीलदार रोहनजी काळे, नायब तहसीलदार बालाजीराव चितळे, ता.अध्यक्ष शिवाजीराव काळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरअप्पा अक्कानरु, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, माजी जि.प सदस्य दयानंदराव सुरवसे, किसान सेल ता.अध्यक्ष रामदासजी घुमे, विश्वनाथ येडके, अंकुश बोंबदरे, हडोळी सरपंच प्रतिनिधी राम पाटील, समाधान डोंगरे ,ओम केंद्रे, नामदेव नितळे आदी मान्यवर उपस्थित होते.