श्री. पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय येथे जागतिक कर्णबधिर दिन साजरा

श्री. पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय येथे जागतिक कर्णबधिर दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय येथे कर्णबधिर दिन साजरा करण्यात आला. जागतिक कर्णबधिर दिन निम्मित डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याच बरोबर जागतिक कर्णबधिर दिन निम्मित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ‘जागतिक कर्णबधिर आठवडा’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार २८ सप्टेंबर या दिवसाला ‘जागतिक कर्णबधिर दिन’ म्हणून संबोधण्यात येते. वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ (WFD) या जागतिक संस्थेची स्थापना सप्टेंबर १९५१ मध्ये रोम, इटली येथे झाली. तेव्हापासून हा जागतिक कर्णबधिर दिन म्हणून पाळला जातो. कर्णबधिरांना न्याय अधिकार आणि समानता मिळवून देण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्णबधिर दिन साजरा करण्यात सहभाग नोंदवला.

About The Author