पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

अहमदपुर (गोविंद काळे) : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला.अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या साई गणेश अॅकाडमी च्या भव्य प्रांगणात माजी सभापती अशोक काका केंद्रे व माजी सभापती सौ.अयोध्याताई केंद्रे यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 273 रक्त दाण्यांनी रक्तदान केले तर 73 गरजू लोकांना अन्नधान्याचे किट देण्यात आले.73 गरजू महिलांना साडीचोळी, 73 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले, 11 मुलींची कन्यादान LIC काढून देण्यात आली,11 विधवा, परीतक्त्या महीलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तर तिन हजार तिऱ्याहतर वृक्षारोपण करण्यात आले.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील हे होते तर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष अँड.भारत चामे, जिल्हा सरचिटणीस त्रिंबक आबा गुट्टे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई तरडे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, माजी सभापती राधाकिशन तेलंग, विलास सुर्यवंशी, अनिरुद्ध केंद्रे हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते देवीची महाआरती करून दिपोत्सव साजरा करुन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी अंकुश जनवाडे, रामभाऊ बेल्लाळे,माजी उपसभापती, बालाजी गुट्टे, निळकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, देविदास सुरनर,नाथराव केंद्रे,बाळु केंद्रे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, डॉ.जयप्रकाश केंद्रे, बाळु मुंडे,माधव केंद्रे, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!