आजी आजोबा स्नेह मेळाव्याच्या अहमदपूर पॅटर्न सर्वांनी स्वीकारावा
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृती जगातील सर्व संस्कृतीपेक्षा वेगळी पण आज एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवारातील आजी-आजोबांना समजून घेण्यासाठी आजी-आजोबा सस्नेह मेळाव्याचा अहमदपूर पॅटर्न सर्वांनी स्वीकारावा असे आग्रही प्रतिपादन लातूरचे जेष्ठ पत्रकार समीक्षक प्रदीप ननंदकर यांनी केले.ते दिनांक 1/10/ 22 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आजी आजोबा सस्नेह मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, प्रवेश प्रक्रियेचे समुपदेशक सचिन बांगड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओम पुणे ,सचिव रेखाताई तरडे,प्राचार्या शोभाताई टोम्पे मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रदीप नणंदकर म्हणाले की,जुन्या काळी खाण्यासाठी पौष्टिक आहार होते. पण ज्यादा कपडे नव्हते. आता परिस्थिती बदलून गेली आहे आता कपड्याचा चंगळ वाद पण प्रेम करणारी माणसे नसल्याची खंत व्यक्त केली. परिवारातील नातवांनी आजी-आजोबांना जपले पाहिजे. मोबाईल मुळे घरातला संवाद कमी झाला आहे. संवाद वाढवा. नातवांना दररोज गोष्टी सांगा.गाणी ऐकवा. असे जाहीर आव्हान केले.यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके म्हणाले की सदरची शाळा संस्काराचे केंद्र असल्याचे सांगून शिक्षणासोबत नैतिक संस्कार ज्येष्ठांचा आदर,सन्मान हा मूलभूत विचार दृढ व्हावा घराघरात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचा शुभारंभ 90 वर्षाचे ज्येष्ठ आजोबा श्री दत्तू नामदेव कांबळे व आजी इंदिराबाई जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात शाल, ग्रंथ आणि वृक्ष देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्या शोभा टोम्पे यांचा सेवानिवृत्ती बद्दल आणि उपक्रमशील शिक्षक रामलिंग तत्तापुरे यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने गणेश दादा हाके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले हस्तलिखित “माझे आजी-आजोबा” याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी समुपदेशक सचिन बांगड, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांचे मार्गदर्शनपर स्वरूपाची भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्र संचालन सतीश साबणे ,तन्वी पस्तापुरे , पंकजा जायभाये, संस्कार गोरे यांनी केले तर आभार शारदा तिरुके यांनी मांनले या मेळाव्यात 370 आजी आजोबा सह शिक्षण प्रेमी नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठांसाठी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. मनोरंजक खेळातून सर्वप्रथम संग्राम साबणे व कांता गुरुनाथ सोनटक्के द्वितीय बालाजी कराड,तृतीय सोपानराव देगावकर आले.यावेळी जगन्नाथ शिंदे,वामनराव सांगुळे, उमाकांत कोनाले,गुंडप्पा तत्तापुरे,सह मान्यवर उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.