प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव आणि डॉ. डी. यु. गवई यांची ‘मिया वाकी’ला भेट

प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव आणि डॉ. डी. यु. गवई यांची 'मिया वाकी'ला भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण असा ‘मिया वाकी’ अर्थात ‘आनंद घन वन’ हा प्रकल्प लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम महात्मा फुले महाविद्यालयाने सुरू केला असून, या प्रकल्पाला शहाजीराजे ऑक्सिजन पार्क असे नाव दिले असून या प्रकल्पास पीपल्स महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव व सायन्स कॉलेज नांदेडचे प्राचार्य डॉ.डी.यु. गवई यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेत पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नाविन्यपूर्ण असलेल्या शहाजीराजे ऑक्सिजन पार्क ‘मिया वाकी’ या प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पाबद्दल उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविणारे महाविद्यालय म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाची ओळख आहे. यावेळी डॉ. रावसाहेब जाधव व प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांनी गुणवत्ते बरोबरच पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य अविरतपणे करीत असल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!