ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ समाजाने घेतला तर समाज प्रगतीशील राहील – रमेशआंबरखाने
उदगीर (एल.पी.उगीले ) : ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध असले तरी ते अनुभव संपन्न व ज्ञानाने संपन्न असतात.त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतला तर समाज प्रगतीशील राहील, असे उद्योजक समाजसेवक रमेशआण्णा आंबरखाने म्हणाले.
नळगीर येथे जिव्हाळा ग्रुप उदगीर व निवासी मतिमंद विद्यालय, नळगीर. तर्फे लेखक रमाकांत बनशेळकीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नळगीर येथील, शतकांच्या उंबरठ्यावर आलेल्या शेतीनिष्ठ महिला श्रीमती सुलोचनाबाई पुंडलिक नादरगे व विविध क्षेत्रातील मान्यवर १५ ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात रमेश अण्णा आंबारखाणे म्हणाले की , ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहे. ती जपली पाहिजे.
व्यासपीठावर विश्वनाथ मुडपे, विश्वनाथ माळेवाडीकर , देविदास नादरगे, शिवमूर्ती भातांब्रे, सूर्यकांत नादरगे,फुलसे इ.मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विश्वास पडिले , सूत्र संचालन लक्ष्मीकांत बिडवाई तर देविदास नादरगे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी भरत नादरगे, सौ. ज्योत्स्ना नादरगे,सौ. रंजना नादरगे, सिकंदर पांचाळ, चंद्रकांत रोडगे, नारायण पेद्दावाड, पांडुरंग बोडके यांनी परिश्रम घेतले.