महिला आघाडीच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान

महिला आघाडीच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी लातूर ग्रामीण च्या वतीने प्रदेशाध्यक्षा आ. उमाताई खापरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.अध्यक्षस्थानी माजी आ. सुधाकर भालेराव होते.व्यासपीठावर जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,शहराध्यक्ष मनोज पुदाले, महानंदा बहेनजी,मीनाक्षी पाटील, बालाजी गवारे,उत्तराताई कलबुर्गे,कल्पना डांगे,सरोजा वारकरे,श्यामला कारामुंगे,वंदना गरड ,रेखाताई हाके यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक महिला आघाडीच्या मीनाक्षी पाटील यांनी केले.
यावेळी आ. उमाताई खापरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मृदुला पाटील,आरती गवारे,डॉ.सोनल चामे, पार्वती गवारे,सुलोचना म्हेत्रे,सविता चौधरी, सरिता द्वासे,पार्वती चौधरी,श्रीमती घटकार या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. रेल्वे बोर्डावर अशासकीय सदस्य असताना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बचत गटाच्या महिलांना उद्योग करण्यासाठी दुकान मंजूर करून घेतल्याबद्दल आघाडीच्या मीनाक्षी पाटील यांचा आ. खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विराज पाटील,संदीप पाटील,आनंद भोसले,रामकिशन मांजरे,निवृत्ती जवळे,आर. एम. लाडके यांनी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!