स्कायलाईन इंग्लिश स्कूल उदगीर परिसरात एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळख – सिध्देश्वरजी (मुन्ना)पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : जनजागृती बहु.सेवाभावी संस्था संचालित स्कायलाईन इंग्लिश स्कूल,येणकी- माणकी रोड येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणाना वाव मिळण्यासाठी नवरात्र उत्सवा निमित्ताने शाळेत एक उत्तम शैक्षणिक उपक्रम म्हणजे दांडीया उत्सव या वर्षी भव्य असे स्कायलाईन दांडीया उत्सव- 2022 चे अयोजन कराण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक सिध्देश्वरजी (मुन्ना) पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वार्ड – 19 च्या लोकप्रिय नगरसेविका श्रीमती.बबिताताई भोसले हे होत्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवाउद्योजक बिपीनभैय्या औटै पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक राजूभाऊ भोसले, मेस्टा संघटनेच्या जिल्हाउपाध्यक्ष विरभद्र घाळे,माणकीचे माजी सरपंच युवा नेते सतिश पाटील माणकीकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहरध्यक्षा.श्रीमती.डाँ.भाग्यश्री घाळे,गुरधाळचे उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे, शिवा मोरे,युवा नेते सिध्देश्वर मोरे भोपणीकर,संस्थेचे सचिव जावेद शेख होनाळीकर इ.मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डान्सटिचर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध नवरात्री स्पेशल गाण्यावर नृत्य सादर केले. या वैयक्तिक व महिला पालक- विद्यार्थी नृत्यसादर करुन उपस्थिताचे मन जिकंली. विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहाने गुजराथी वेशभुषा परिधान करुन सर्व प्रेषकांचे मने जिकंले. क्लास प्रमाणे नृत्य केल्याने विद्यार्थी खुपच आकर्षण ठरले हा कार्यक्रम पाहुण उदगीर परिसरात दानशूर व्यक्तीमत्व असलेले सिध्देश्वरजी (मुन्ना) पाटील यांनी शाळेचे गरज ओळखून 11 हजार रुपऐ मदत साऊड सिस्टीम घेण्यासाठी जाहिर केले.
इंग्रजी माध्यामाच्या शाळाचे महत्त्व पालकांना अनेक उदाहरणे देवून सबोधित केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. खंडराज गायकवाड यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा.जावेद शेख होनाळीकर यांनी केले. अभार प्रदर्शन मोरे भोपणीकर यांनी केले. हा कार्यक्रम पाहुण उपस्थित पालक व शाळेच्या परिसरात नागरीकांनी विद्यार्थी व शाळेचे कौतुक संस्थेचे कार्यध्यक्ष इकराम उजेडे,सहसचिव मुस्तफा पटेल माणकीकर ,पैमुन उजेडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या अंजूम शेख होनाळीकर,रेखा बिरादार,संध्याराणी कळसे,बिडवे ,अंजली ताई,मयुरी बिडवे,मुजीब पटेल,के.जी.एन मंडप सेवाचे असलम पटेल,बाळू खतगावे,शिवराज गायकवाड इत्यादिंनी प्रयत्न केले. या दांडीया कार्यक्रमासाठी शाळेतील व परिसरातील महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.