आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप !
अहमदपूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे घरपडझड झालेल्या 69 कुटुंब धारकांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधन मृत्यू पावलेल्या 4 पशुपालकांना आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. सुनेगाव येथील पुरात म्हैस वाहून गेलेल्या पशुपालक राम मारोती थनगर यांना 30 हजार रुपये, हंगेवाडी येथे वीज पडून म्हैस दगावलेल्या पशुपालक रामकीशन मारोती आंधळे यांना 30 हजार रूपये, चिखली येथे पुरात म्हैस वाहून गेलेल्या पशुपालक वैजनाथ ज्ञानोबा चाटे 30 हजार रुपये आणि थोडगा येथील पुरात वाहून गेलेल्या दोन गाई बाबत पशुपालक माधव बाबुराव हेन्डगे यांना 60 हजार रुपये मदत देण्यात आली. तसेच अहमदपूर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे व अतिवृष्टीमुळे घरपडझड झालेल्या 69 कुटुंब धारकांना प्रत्येकी 6 हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आला.
प्रसंगी तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंदजी हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमूख, जि.प सदस्य माधवराव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, शहराध्यक्ष अझहर भाई बागवान, युवक जि.कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, गोपीनाथराव जोंधळे, नगरसेवक भैय्याभाई सरवरलाल, नबी सय्यद, प्रकाश ससाणे, अशोक सोनकांबळे, फेरोज शेख, लखन गायकवाड, अनिस कुरेशी, शरीफ बागवान, तरडे आदी मान्यवर उपस्थित होते.